समाज कल्याण आणि सामाजिक न्याय
समाज कल्याण आणि सामाजिक न्याय या पुस्तकातून समाज कल्याण संकल्पनेची समज विकसित होईल, कल्याणकारी योजना आणि समाज कल्याणाची क्षेत्रे समजून घेण्यात मदत होईल, सामाजिक न्यायाची संकल्पना, सामाजिक न्यायासाठी घटनात्मक तरतुदी समजण्यास मदत होईल, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्यायाच्या योजना समजून घेण्यासाठी मदत होईल. या पुस्तकातून समाज कल्याण व सामाजिक न्याय याचे ज्ञान प्राप्त करू होईल. सदर पुस्तकात समाज कल्याणाचा अर्थ, व्याख्या, संकल्पना, समाज कल्याणाचे स्वरूप, समाज कल्याणाचे महत्व, समाज कल्याणाचे प्रारूपे, कल्याणकारी राज्याची संकल्पना, कल्याणकारी योजनामध्ये - दारिद्य्र निर्मुलन कार्यक्रम, रोजगार हमी योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, समाज कल्याणाच्या क्षेत्रापैकी महिला कल्याण, बालकल्याण, दिव्यांग कल्याण, वृद्ध कल्याण इ. बाबत सविस्तर लिखाण केलेले आहे.